बस नेहमी इतक्या घाईत का असते? तिला कळत नाही का की आपण किती आशेने तिची वाट बघत असतो? ती नसतांना घड्याळाचा काटा पुढेच सरकत नाही - ती दिसल्यास मन हलकं होतं! तिला माहीत नसतं, का ती मुद्दामून दुर्लक्ष करते? तिलापण खूप लोकांची काळजी असेल, नाही? त्यांना वेळेवर कामावर पोहोचवायचं, मुलांना शाळेत पोहोचवायचं, सुट्टी झाली की घरी पोहोचवायची घाई असते ओ! पण तरी - ती सारखी एवढ्या रागात का असते? तिचा ठिपका घाई घाईत मोठा होत जातो, पाच सेकंद थांबते ती, आपण चढेपर्यंत ती घाई-घाईत सुटते - आपले पाय आत, डोकं बाहेर, आणी आपला जीव हातांच्या चिकटीवर अवलंबून!
पण खरच - एकदा बसायला जागा मिळाली की इतकं शांत वाटतं! तिथपर्यंत पोचायची झुंज आपण विसरतो. बस इतक्या जोर-जोरात ओरडत असते की मला माझेच शब्द ऐकू येत नाहीत. विचार थांबतो. नशीबाने खिड़की जवळ जागा मिळालेली असते. आपलं मन बाहेरच्या दृ्ष्यामध्ये रमून जातं.
माहीत आहे का? बसमध्ये सगळे सारखे असतात - ब्रीफकेस बाबू, टाइमपास तरुण, बोलक्या बायका, ओढलेले आजी-अजोबा, पिंटू पोरं. तिकीटाच्या एकाच मूल्याने सारखे झालेले हे सगळे. सगळ्यांचा एकाच ध्येय - वेळेवर पोहोचायचा, सगाल्यांची एकच गुपित इच्छा - की ही जादूची बस असावी . आज कामावर, शाळेला, दुकानात जायची काही गरज नाही. आज आपण ह्या जादूच्या बसमध्ये बसून आपल्या ह्या शहराचे रस्ते फिरायचे. बाहेरचं आयुष्य खिडकीतून बघायचा - पण आज एकच दिवस बस मधलं घड्याळ इथेच थांबू दे !
पण ही जादूची बस नसते. केव्हातरी उतरावं लागतं. बस आपल्याला सोडून जाते. तिची नेहमीची घाई. आपल्याला ती विसरते. घरी पोहोचल्यावर, आपण तिला विसरतो. आयुष्याची नेहमीची घाई..

5 comments:
excuse the spellings. :)
परत शाळेत गेल्यासारख वाटल! कारण मी बारावीनंतर मराठी वाचले कुठे? "टाइमपास तरुण", "पिंटू पोरं" ... मराठी लेखनाची आठावना जहाली!
आणि छान लिहिलाय. बुस्मध्ये बसल्यावर, ट्रेनमध्ये चढल्यावर, उतरावास वाटतच नाही!
!!!! :(
@Anonick: My spellings don't need to be excused. :P How do you type in Devnagri here?
@Sushant: Hee haw. You lowly beings can continue to suffer.
It's difficult to get everything correct with transliteration tools, in my defense. :P Besides, I'm not sure I know the spellings enough to correct them. :P
Well, http://www.google.com/transliterate/indic .
Post a Comment